
पुणे : राज्य सरकारने महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर आज (ता. १२) प्रभाग रचना तयार करण्यासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आले. ११ जूनपासून प्रारूप प्रभाग रचना तयार होणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४ सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोचण्याची शक्यता आहे.