Katraj Chowk Work : कात्रज चौकातील जागा ताब्यात येताच कामाला सुरुवात

कात्रज चौकातील खासगी जागा महापालिकेला ताब्यात मिळाल्यानंतर लगेच आजपासून तेथे रस्ता तयार करण्याचे काम पथ विभागाने सुरु केले आहे.
Katraj Chowk Work
Katraj Chowk Worksakal
Updated on

पुणे - कात्रज चौकातील खासगी जागा महापालिकेला ताब्यात मिळाल्यानंतर लगेच आजपासून तेथे रस्ता तयार करण्याचे काम पथ विभागाने सुरु केले आहे. त्यामुळे कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कमी होणार आहे.

कात्रज चौकातील सर्वे क्रमांक १/२ ही खासगी व्यक्तीची जागा आहे. या जागेवर १९८७ च्या विकास आराखड्यात ३० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित केला होता, त्यासाठी ६ हजार २०० चौरस मीटर जागा महापालिकेला ताब्यात घ्यावी लागणार होती. पण महापालिकेने ही जागा ताब्यात घेतली नाही.

त्यानंतर २०१७ च्या विकास आराखड्यात या जागेवर ३० मीटर रस्त्याऐवजी ६० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. महापालिकेने जागा मोजणी करून, जागेचे मूल्यांकन करून भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली. त्यामध्ये २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार २१ कोटी ५७ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे.

कात्रज चौकात सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे, हा पूल झाल्यानंतर वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल. पण आता ही जागा ताब्यात आल्यानंतर नागरिकांना लगेच दिलासा देणे शक्य आहे. त्यासाठी महापालिकेने आज सुट्टी असतानाही तेथे कामाला सुरवात केली आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा, माती, राडारोडा पडलेला असून, तो जेसीबीच्या साह्याने काढण्याचे काम सुरु केले आहे.

पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘कात्रज चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या जागेवर रस्ता तयार करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आजपासून कामाला सुरुवात केली आहे. हा चौक खूप वर्दळीचा आहे, अवजड वाहतूक आहे त्यामुळे येथे सिमेंट काँक्रिटचा मजबूत रस्ता करणे आवश्‍यक आहे. या कामाला थोडासा वेळ लागेल, पण त्यानंतर कोणतेही अडथळे येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com