भामा आसखेडचे काम लवकर मार्गी लागणार

भामा आसखेडचे काम लवकर मार्गी लागणार

पुणे - भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याची रक्कम पुढील काही दिवसांमध्ये त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाला केली. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करावा, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील कामाला गती येऊन ते लवकर पूर्ण होण्याची आशा आहे. 

या प्रकल्पाचा सिंचन पुनर्स्थापना खर्च तत्कालीन सरकारने माफ केला असून, त्यांच्याऐवजी महापालिकेने शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टर १५ रुपयांप्रमाणे निधी देण्याचा आदेश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिला होता. त्यानुसार महापालिकेने अर्थसंकल्पात ७० कोटींची तरतूदही केली आहे. 

मात्र, शेतकरी अजूनही आपल्या काही मागण्यांवर ठाम राहिल्याने प्रकल्पाचे काम वेगाने पुढे सरकत नाही. ते येत्या मार्च महिन्यांत पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न  आहे. 

या प्रकल्पाचे काम आटोपण्याची सूचना पवार यांनी केली होती. त्यानंतर आता नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असे पवार यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com