पुणे : भगदाड पडलेल्या ठिकाणी भिंत बांधण्याचे काम सुरू

पुणे : भगदाड पडलेल्या ठिकाणी भिंत बांधण्याचे काम सुरू
Updated on

पुणे : लष्कर जलकेंद्राला पाणी देण्यासाठी भगदाड पडलेल्या ठिकाणी भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. त्या बाजूने सिमेंट पोत्यात माती बंधारा बांधून कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन होते. परंतु कालव्यात जास्त पाणी सोडल्याने ते पाणी पुन्हा दांडेकर पुलाच्या ओढ्यातून वाहू लागल्याने येथे भीतीचे वातावरण झाले होते. 

लष्कर जलकेंद्रला बंद जलवाहिनीतून 250 एमएलडी पाणी जात आहे. उर्वरित 150 एमएलडी म्हणजे 60 क्यूसेक पाणी कालव्यातून घेतले जाते. त्याप्रमाणे कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यासाठी, पर्वती जलकेंद्रातून कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी भिंतीच्या कडेला अर्धवर्तुळ आकार सिमेंट पोत्यात माती भरून बंधारा केला. त्यानंतर पालिकेच्या पर्वती जलकेंद्रातून तीन साडेतीन वाजता पाणी सोडले. ते पाणी  भगदाड पडलेल्या या ठिकाणी पोचले तेथून पुढे गेले. परंतु पाणी कमी असल्याने ते पर्वती पुलाजवळ अडकले. पाठीमागे पाणी जास्त साठू लागले.

परिणामी पोत्यांच्या बंधाऱ्यावरून पाणी भिंतीच्या काम सुरू असलेल्या पायावरून परवा प्रमाणे दांडेकर पूल येथील ओढ्यातून बाहेर पडले. त्या पाण्याचा आवाज झाला. ओढ्यातील पाण्याची पातळी वाढल्याने दांडेकर पूल परिसरात पुन्हा पाणी आल्याने स्थानीक नागरिक काम सुरू असलेल्या ठिकाणी पोचले पालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी वाद घालायला सुरवात केली. त्यानंतर पर्वती जलकेंद्रातुन कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद केले. 

कालव्यातून पाणी सोडू नये- बापट

भिंतीचे काम पूर्ण झाल्याशिवाय कालव्यातून लष्कर भागाला पाणी सोडण्यात येऊ नये, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेच्या व पाटबंधारे विभागच्या अधिकाऱयाने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com