वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाचे काम सहा महिन्यांपासून ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

महाराष्ट्रातील सर्व 14 मंचांमध्ये मिळून महिन्याकाठी जवळपास 90 दावे दाखल होतात. सामान्य परिस्थितीत जेमतेम निम्म्या दाव्यांचा निकाल 60 दिवसात दिला जातो. इतका ढिसाळ कारभार या मंचाचा आहे. या सर्व मंचावर मिळून वर्षाकाठी काही कोटी रुपये ग्राहकांच्या वीजबिलातून खर्च केले जातात. तरीही ग्राहकाला वेळेत निकाल दिले जात नाहीत. सहा महिने या मंचाचा कारभार ठप्प असून पगारासह सर्व खर्च मात्र चालूच आहेत. तसेच अनेक दाव्यांची सुनावणी पूर्ण होऊनही निकाल दिला गेलेला नाही. 

पुणे : पुण्यासह राज्यातील 14 वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे जवळपास सव्वाशेहून अधिक दावे सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. वीज कायद्यातील तरतुदीनुसार तक्रार दाखल झाल्यापासून 60 दिवसांत या मंचानी आपला निकाल देणे बंधनकारक आहे. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या मंचाचा कारभार ठप्प आहे. त्यामुळे तातडीने सर्व मंचांना ऑनलाइन पद्धतीने सुनावणी सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाने विद्युत लोकपाल यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व 14 मंचांमध्ये मिळून महिन्याकाठी जवळपास 90 दावे दाखल होतात. सामान्य परिस्थितीत जेमतेम निम्म्या दाव्यांचा निकाल 60 दिवसात दिला जातो. इतका ढिसाळ कारभार या मंचाचा आहे. या सर्व मंचावर मिळून वर्षाकाठी काही कोटी रुपये ग्राहकांच्या वीजबिलातून खर्च केले जातात. तरीही ग्राहकाला वेळेत निकाल दिले जात नाहीत. सहा महिने या मंचाचा कारभार ठप्प असून पगारासह सर्व खर्च मात्र चालूच आहेत. तसेच अनेक दाव्यांची सुनावणी पूर्ण होऊनही निकाल दिला गेलेला नाही. 

विद्युत लोकपाल यांच्या कार्यालय जून पासून ऑनलाइन पद्धतीने सुनावण्यात घेऊन निकालही देत आहे. परंतु वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कामकाज ठप्पच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या सर्व मंचांना तातडीने ऑनलाइन पद्धतीने सुनावण्या सुरू करण्यास सांगावे. तसेच सुनावण्या मार्चमध्येच पूर्ण झालेल्या सर्व दाव्यांचा निकाल तत्काळ देण्याचे आदेश द्यावेत, असेही वेलणकर यांनी पत्रात म्हटले आहे. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरातील तक्रार निवारण मंचाकडे 17 दावे प्रलंबित आहेत. हे सोडून सा दाव्यांचा सुनावणी 19 मार्च रोजीच पूर्ण झाली असून देखील त्यांचा निकाल दिलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work of Electricity Consumer Grievance Prevention Forum stalled for six months