esakal | वेदपाठशाळेचे कार्य कौतुकास्पद - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat singh koshyari

वेदपाठशाळेचे कार्य कौतुकास्पद - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोथरूड येथील वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेला गुरुवारी भेट दिली. वेदपाठशाळेच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी वेदपाठशाळेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

कोथरूड परिसरातील वेदभवन येथे उभारण्यात आलेल्या अभ्यागत कक्षाची पाहणी करून राज्यपालांनी उपस्थित प्रमुख प्रतिनिधींशी संवाद साधला. कोश्यारी म्हणाले, वेदपाठशाळेच्या माध्यमातून वेदाचा प्रचार व प्रसाराचे मोठे कार्य होत आहे. वेद जाणून घेण्यासाठी परदेशातून लोक भारतात येतात. हजारो वर्षांपासून एकाकडून दुसऱ्याकडे वेदाचे ज्ञान आले आहे. हा ज्ञानप्रवाह पुढे नेण्यासाठी वेदपाठशाळेच्या माध्यमातून घैसास गुरुजींचे कार्य कौतुकास्पद आहे. वेदपाठशाळेचे प्रमुख घैसास गुरुजी यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. तसेच, आश्रमातर्फे चालविल्या जाणाऱ्या सेवाकार्याची आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. या वेळी वसंत ठकार यांनी वेदपाठशाळेसाठी दिलेला धनादेश राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते घैसास गुरुजी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. वेदपाठशाळेचे विश्वस्त मुकुंदराव चितळे, दत्तात्रेय सप्रे यांच्यासह प्रमुख प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

loading image
go to top