Baramati Indapur Road Work
sakal
पुणे - श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. स्थानिकांनी विरोध केल्याने बारामती ते इंदापूरदरम्यानच्या चार गावांजवळ रस्त्याचे काम रखडले होते.
मात्र त्यांची समजूत काढण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यश आले असून उर्वरित कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. पालखी येण्यापूर्वी या रस्त्यावरील डांबरीकरण पूर्ण झाले असेल, परिणामी वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.