esakal | बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा घेतला पवित्रा
sakal

बोलून बातमी शोधा

A work stoppage agitation has been organized to get the amount of sanugrah grant to the employees of Baramati Municipality.jpg

दिवाळीनिमित्त नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा घेतला पवित्रा

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी बारामती नगरपालिकेच्या इमारतीवर चढून आज आंदोलन सुरु केले. 

दिवाळीनिमित्त नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

काल नगरपालिकेच्या वतीने या कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी कोणीही न गेल्यामुळे हा प्रश्न आज अधिकच चिघळला. किमान कर्मचाऱ्यांची नगरपालिकेच्या नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी येऊन भेट घ्यावी, अशी या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी होती. असे असताना कोणीही त्यांना भेटायला देखील न गेल्यामुळे आज नगर पालिका कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सानुग्रह अनुदान मिळालेच पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान या संदर्भात या कर्मचाऱ्यांची चर्चा करण्यासाठी काही प्रमुख नगरसेवकही गेले होते , मात्र अकरावाजेपर्यंत या आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नव्हता. 

कर्मचाऱ्यांनी अनुदान देण्याच्या संदर्भात अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. त्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी सर्व कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. नागरिकांना वेठीस न धरता हे आंदोलन होईल, अशा पद्धतीची भूमिका नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र अद्यापही या संदर्भात तोडगा निघालेला नाही. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी सानुग्रह अनुदान दिलेले असताना बारामती नगरपालिका हे अनुदान का देत नाही, असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे. कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी केलेले काम विचारात घेता सहानुभूतीने निर्णय घ्यावा, अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले