
आज सकाळी नगरपालिका संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे व इतर सहका-यांनी मुख्याधिकारी किरणराज यादव यांची या संदर्भात भेट घेतली. मात्र या बाबतचा निर्णय नगरपालिकेच्या सभागृहाने करायचा आहे आपण त्याची अंमलबजावणी करणार असल्याने आपल्या हातात फारसे काही नसल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीत सानुग्रह अनुदानासाठी कर्मचाकडून काम बंद आंदोलन सुरु
बारामती : सानुग्रह अनुदान न मिळाल्याने बारामती नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी आज सकाळपासून काळ्या फिती लावत काम बंद आंदोलन सुरु केले. गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी दिवाळीत सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते, यंदा मात्र दिवाळी येऊनही नगरपालिकेकडून या बाबत निर्णय न झाल्याने कर्मचारी नाराज झाले होते.
आज सकाळी नगरपालिका संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे व इतर सहका-यांनी मुख्याधिकारी किरणराज यादव यांची या संदर्भात भेट घेतली. मात्र या बाबतचा निर्णय नगरपालिकेच्या सभागृहाने करायचा आहे आपण त्याची अंमलबजावणी करणार असल्याने आपल्या हातात फारसे काही नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान या संदर्भात निवडणूकीची आचारसंहिता सुरु आहे यासह मार्चपासून नगरपालिकेला उत्पन्न नसून जवळपास 30 कोटी रुपयांची येणेबाकी नगरपालिकेला आहे, त्याचा विचार करता यंदा सानुग्रह अनुदान देणे शक्य नसल्याचे नगरपालिका प्रशासनाचे मत आहे.
या संदर्भात कर्मचाऱ्यांनी आज मुख्याधिकारी किरणराज यादव यांना निवेदन देत सानुग्रह अनुदानाची मागणी केली. कोरोनाच्या काळात गेल्या सात महिन्यांपासून नगरपालिकेचा कर्मचारी जिवावर उदार होऊन बारामतीकरांसाठी कार्यरत असून या कर्मचाऱ्यासह कुटुंबियांना दिवाळीसाठी अनुदान मिळावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काही नगरसेवकांनी कर्मचाऱ्याची बाजू आज लावून धरली होती, मात्र वसूलीच नसल्याने मुळातच नगरपालिका फंडात रक्कमच नसल्याने सानुग्रह अनुदान कोठून द्यायचे, तांत्रिक व कायदेशीर बाबींची अडचण असल्याने यंदा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापासून वंचितच राहावे लागणार हे जवळपास स्पष्ट झाले.
आर्थिक परिस्थिती बिकट....
यंदा बारामती नगरपालिकेच्या वसूलीची स्थिती बिकट आहे. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे वसूली नाही, त्याचा नगरपालिका फंडावर विपरीत परिणाम झाला आहे. कर्मचा-यांना दिवाळीच्या सणानिमित्त काही मदत व्हावी अशी सर्वांचीच इच्छा आहे, मात्र आर्थिक स्थितीचा विचार करता यंदा असे अनुदान देणे अवघड आहे. या बाबत काही मार्ग काढता येणे शक्य आहे का या बाबत चर्चा सुरु आहे, मात्र आर्थिक परिस्थितीचा विचार करता यंदा अनुदान देता येणे अवघड आहे.
– पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बा.न.प.
Web Title: Work Stoppage Agitation Started Employees Sanugrah Grant Baramati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..