Pune News : पाय घसरल्याने पहिल्या मजल्यावरून पडल्याने कामगार महिलेचा मृत्यू

हडपसर परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी पहिल्या मजल्यावरून पडल्याने कामगार महिलेचा झाला मृत्यू.
death
death sakal
Updated on

पुणे - हडपसर परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी पहिल्या मजल्यावरून पडल्याने कामगार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मांजरी बुद्रूकमधील गोपाळपट्टी भागात घडली.

अरुणाबाइ चौबे (वय ३५, रा. टकलेनगर, गोपाळपट्टी, मांजरी रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही कामगार महिला मूळची छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना सुरक्षेचे साहित्य, हेल्मेट दिलेले नव्हते.

१८ जानेवारी रोजी या महिलेचा अचानक पाय घसरल्याने ती पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिस अंमलदार आर.डी. खैरे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल बिनवडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com