
पिंपरी : हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना मरणोत्तर तपासणीसाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणण्यात आले. पोलिसांनी मृतांच्या नातेवाइकांना ओळख पटवून घेण्यासाठी बोलावून घेतले. त्यावेळी कुटुंबांतील सदस्यांनी टाहो फोडला. त्यामुळे उपस्थितांची मने हेलावून गेली.