Spare Parts Theft : वासुली फाटा (ता. खेड) येथील वर्कशॉपमध्ये २६ तारखेला पहाटे २ वाजता मोठी चोरी झाली. साडे पाच लाख रुपयांचे स्पेअर पार्ट लंपास झाले असून, पोलीस तपास सुरू आहे.
आंबेठाण : वासुली फाटा ( ता.खेड ) येथील एका वर्कशॉपमधून साडे पाच लाख रुपयांच्या स्पेअर पार्टची चोरी झाली आहे. याबाबत अतुल मारुती पांगारे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. २६ तारखेला पहाटे २ च्या दरम्यान ही घटना घडली.