esakal | जागतिक न्याय दिनानिमीत्त 3KM चा 'द कॉमिक टेल्स' कार्यक्रम; तुमचा सहभाग नोंदवा
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक न्याय दिनानिमीत्त 3KM चा 'द कॉमिक टेल्स' कार्यक्रम; सहभाग नोंदवा

जागतिक न्याय दिनानिमीत्त 3KM चा 'द कॉमिक टेल्स' कार्यक्रम; सहभाग नोंदवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जागतिक न्याय दिन हा दरवर्षी 17 जुलैला साजरा करण्यात येतो. या जागतिक न्याय दिनानिमीत्त 3KM आपल्यासाठी घेऊन येतंय “द कॉमिक टेल्स”. हो...तुम्ही ऐकलंत ते खर आहे! लॉकडाऊनमध्ये घरात बसुन बोर झाला असाल...तर हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठीच आहे. पुण्यातले अस्सल विनोदवीर झाहीद मिर्झा, समृद्धी ठाकुर,अथर्व सुदामे,देव्यानी मोरे,वरद मोरे,वरद डोंगरे आणि मनराज सिंग यांची जबरदस्त विनोदाची मैफील आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

भन्नाट विनोदी आणि जबरदस्त स्डॅंडप कॉमेडीचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी लवकरात लवकर आपले तिकीट बुक करा! विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रेक्षकांना गिफ्ट हॅंपर्स आणि फुड कुपन्स सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे आजच आपले तिकीट आजच बुक करा आणि त्यामुळे नक्कीच या कार्यक्रमात सहभागी व्हा.

कार्यक्रमाचे नाव: द कॉमिक टेल्स

दिनांक: 16 जुलै2021

ठिकाण: SIILC, बानेर रोड,पुणे

वेळ सकाळी:11:30

तिकीट फक्त:150 रुपये

पेमेंन्ट लिंक : https://rzp.io/l/5AToGdoN

दरवर्षी 17 जुलैला जागतिक न्याय दिन साजरा केला जातो. 2010 पासून याची सुरुवात झाली. 17 जुलै ही रोममध्ये संविधान लागू झाले होते. 1 जून 2010 रोजी युगांडातील कंपाला इथं रोमच्या संविधानावर चर्चा कऱण्यासाठी संमेलन आयोजित केलं होतं. तेव्हा 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जागतिक स्तरावर न्यायाच्या बाजूने उभा राहण्यासाठी लोकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. तसंच या दिवसाचा मुख्य उद्देश हा पीडितांना अधिकार मिळावेत हा आहे.

loading image