

वर्ल्ड ऑफ कॉंक्रिट इंडियाचे मुंबईत आयोजन
पुणे, ता. १९ ः कॉंक्रिट क्षेत्रातील देशातील सर्वसमावेशक ‘वर्ल्ड ऑफ कॉंक्रिट इंडिया’ हे प्रदर्शन मुंबईत ३ ते ५ जून दरम्यान होणार आहे. यंदा यात ३५० हून अधिक आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत ब्रँड आणि १८,००० हून अधिक व्यावसायिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यानिमित्त इन्फॉर्मा मार्केट्सतर्फे आयोजित परिषदेत पुणे आणि पश्चिम भारतातील वेगाने वाढणाऱ्या पायाभूत सुविधा, नवे बांधकाम साहित्य आणि शाश्वत बांधकाम पद्धतींची गरज, बाजारपेठेतील संधी, विकासाला चालना देण्यामध्ये नावीन्यपूर्णतेची असलेली परिवर्तनात्मक भूमिका यावर सखोल चर्चा झाली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, पुणेचे राज्य सचिव मनोज देशमुख; आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश बांगड; इंडस्ट्रिअल फ्लोअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अजय सिंगम; आईजीएसचे वरिष्ठ संचालक सुयोग केळुस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
खर्च, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यांसारख्या प्रमुख आव्हानांना तोंड देण्यासाठी उद्योग आणि सरकार यांच्यात अधिक मजबूत सहकार्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. बांधकाम क्षेत्रात मोठी वाढ होत असून, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सिमेंटचे उत्पादन ४९ कोटी टनांच्या आसपास असण्याची अपेक्षा आहे, ज्यात वार्षिक आठ ते नऊ टक्के वाढ नोंदवली जाईल. २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने केलेल्या १२.२ लाख कोटींच्या विक्रमी भांडवली खर्चाच्या तरतुदीमुळे महामार्ग, रेल्वे, लॉजिस्टिक आणि प्रादेशिक पायाभूत सुविधांच्या विकासाला आणखी चालना मिळत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.