कोरोनासोबत जगण्याच्या तंत्राला जागतिक उपविजेतेपद 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 22 September 2020

कोरोनासोबत जगण्यासाठी विकसित केलेल्या व्यवस्थापन प्रणालीचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. इंटरनॅशनल बेटर हेल्थ हॅकेथॉन स्पर्धेच्या जागतिक गटात पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्‍नोलॉजीच्या (पीआयसीटी) संघाने उपविजेतेपद पटकावले आहे.

पुणे, ता. 21 : कोरोनासोबत जगण्यासाठी विकसित केलेल्या व्यवस्थापन प्रणालीचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. इंटरनॅशनल बेटर हेल्थ हॅकेथॉन स्पर्धेच्या जागतिक गटात पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्‍नोलॉजीच्या (पीआयसीटी) संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी तन्मय जैन आणि क्रिशा भांबानी यांचा या संघात समावेश होता. संघाच्या "कोविड स्पाय' या सादरीकरणाला "कोड फॉर कोविड 19' या जागतिक गटात उपविजेतेपदासह 10 हजार डॉलर्सचे पारितोषिक मिळाले आहे. 

कोरोना काळात जागतिक स्तरावर उपयुक्त ठरतील अशा उपाययोजना शोधून काढणाऱ्या गुणवान तंत्रज्ञानांना आणि संगणक विकासकांच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हॅकेथॉन संयोजकांनी दिलेल्या समस्यांवर उपाययोजना शोधून काढण्यासाठी सुमारे 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.

या स्पर्धेच्या परीक्षक व सल्लागार मंडळात जॉन हॉपकिन्स, केम्ब्रिज विद्यापीठ, टक स्कुल ऑफ बिझनेस, इंटरनॅशनल एसओएस अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमधील तज्ञांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये50 देशांमधील 200 संघ आणि 7500 हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना डॉ.कविता सुलतानपुरे, संस्थेच्या व्यवस्थापनाने आणि प्राचार्याचे मार्गदर्शन लाभले. 

काय आहे "कोविड स्पाय' :
कोविडस्पाय ही व्हिडिओवर आधारित व्यवस्थापन प्रणाली असून यामध्ये तापमानाची तपासणी, मास्क डिटेक्‍शन, सोशल डिस्टन्सिंग वायोलेशन डिटेक्‍शन यांचा समावेश आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन होत नसलेल्या ती जागा ओळखणे, तसेच त्याची ओळख पटवणे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World runner-up to the technique of living with Corona