Wagholi News : वडगाव शिंदे येथील हातभट्टीवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; एक कोटी रुपयांचे रसायन व दारू हस्तगत

लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव शिंदे येथील दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने छापा टाकून सुमारे एक कोटी सहा लाख रुपयांचे रसायन व दारू हस्तगत केली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wagholi News
Wagholi News Sakal

वाघोली - लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव शिंदे येथील दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने छापा टाकून सुमारे एक कोटी सहा लाख रुपयांचे रसायन व दारू हस्तगत केली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस हवालदार तुषार नामदेव मिवरकर यांनी फिर्याद दिली. तर अशोक गोवर्धन सोलंकी ( वय ४४ वर्षे ), अरुण रमेश कुवरीया, संजय जगन्नाथ कुवरीया ( तिघेही रा. वडगाव शिंदे ता. हवेली, जि.पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शिंदे येथील हातभट्टी वर छापा टाकल्यानंतर एक कोटी पाच लाख रुपये किमतीचे २,१०,००० लीटर हातभट्टी दारु तयार करणेसाठी लागणारे रसायन, एक लाख 80 हजार रुपये किमतीची १५०० लिटर हातभट्टी गावठी दारु, ते तयार करण्यासाठी लागणारे 15 हजार रुपये किमतीचे साहित्य. असा सुमारे एक कोटी सहा लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com