Wrestling Championships : अवसरी खुर्द कुस्त्यांच्या आखाड्यात 250 पहिलवान सहभागी

नऊ लाख 50 हजार रुपये इनाम वाटप
Wrestling Championships
Wrestling Championshipssakal

मंचर : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.१४) श्री काळभैरवनाथ महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांच्या झालेल्या आखाड्यात २५० हून अधिक पहिलवानांनी भाग घेतला. दरम्यान कुस्ती खेळण्यासाठी युवा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ व काका पवार तालमीचे पैलवान अनिकेत मांगडे,

आशिया सुवर्णपदक विजेत्या पैलवान भाग्यश्री फंड व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या पैलवान सानिका पवार आदी नामवंत पैलवान आले होते. नऊ लाख ५० हजार रुपये इनाम विजेत्या पहिलवानांना विभागून देण्यात आला. कुस्त्या पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

यात्रा समितीने प्राथमिक शाळेच्या मैदानावर कुस्त्यांचा आखाडा भरविला होता. दूरवरच्या भागातून नामांकित पैलवानांनी येथे हजेरी लावली. महिलांच्या कुस्त्याही लक्षवेधक झाल्या. त्यामध्ये जय मल्हार केसरी पैलवान युवराज खोपडे व महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संकेत घाडगे, सुनील एरंडे (बारामती) ,

श्वेत खोपडे (सासवड), सिद्धी होळकर (शिरूर), साक्षी शेलार, सोनाली गिरमे (पैठण), अंजली लोंढे आदी ४० कुस्त्या अटीतटीच्या व लक्षवेधक झाल्या. पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांना मानाची गदा व एक लाख ११ हजार रुपये रोख इनाम देऊन श्यामराव थोरात व उद्योजक मिलिंद खुडे यांच्या हस्ते व यात्रा समितीचे निमंत्रक सुरेश भोर,

संजय वायाळ, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रज्ञा भोर, प्रसाद कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. पारस मिरॅकल प्लास्टिक (बोथरा उद्योग समुह नगर) व पत्रकार डॉ. सुदाम बिडकर यांच्यावतीने मुलींच्या दहा कुस्त्यांसाठी विजेत्या स्पर्धकास प्रत्येकी एक हजार ३०० रुपये किमतीचे प्रत्येकी असे एकूण १० पारस बाथरूम सेट बक्षीस म्हणून देण्यात आले.

महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवराज राक्षे यांचा सत्कार भारतीय कुस्ती महासंघाचे महासचिव गौरव रोशनलालजी सचदेवा व कार्याध्यक्ष जोगिंदर सिंग, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सचिव मोहन नाना खोपडे, टी अँड टी ईन्फ्राचे मालक श्रीमंत तांदूळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

अन्य पहिलवानांना उद्योजक भरत भोर, प्रशांत अभंग, रामदास भोर, निलेश टेमकर, प्रवीण टेमकर, शांताराम अभंग, मुरली कराळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.नवनाथ शिंदे,अक्षय मुळूक, राजेंद्र पाबळे यांनी सूत्रसंचालन केले. कुस्त्यांचा आखाडा प्रेक्षकांना व्यवस्थित पाहता यावा म्हणून डिजिटल स्क्रीनची सोय व यूट्यूबवर लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com