NCP leader alleges wrong arrest kept senior citizen in jail for 88 days in Lonavala case
esakal
पुणे : पोलिसांनी आरोपीऐवजी भलत्याच व्यक्तीला अटक केल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला ८८ दिवस कारागृहात काढावे लागले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोमवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे लोणावळा पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.