Loksabha 2019 : पदरमोड करुन यमुना आज्जींनी केले लेक अन् सुनेसह मतदान

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पुणे : यमुना काळे व त्यांचा मुलगा व सुनबाई पदरमोड करुन चंदननगर येथून शिवाजीनगर येथे मतदान करण्यासाठी आल्या आहेत. "मतदान न करणे म्हणजे आपण मेल्यागत आहोत, कुणाला पण करा, पण मतदान करा, आपला अधिकार का गमावता" असे 63 वर्षाच्या यमुना आजी यांनी सांगितले​

पुणे : यमुना काळे व त्यांचा मुलगा व सुनबाई पदरमोड करुन चंदननगर येथून शिवाजीनगर येथे मतदान करण्यासाठी आल्या आहेत. "मतदान न करणे म्हणजे आपण मेल्यागत आहोत, कुणाला पण करा, पण मतदान करा, आपला अधिकार का गमावता" असे 63 वर्षाच्या यमुना आजी यांनी सांगितले.

पूर्वी कृषी महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या यमुना आज्जींनी आता चंदननगरला राहायला गेल्या आहेत. एका व्यक्तीसाठी चंदननगर ते शिवाजीनगर ये-जा करण्यासाठी 100 रूपये खर्च येतो. यमुना आजी, त्यांची सुन आणि मुलगाअसे तिघेजण 300 रुपये खर्च करुन, उन्हातान्हात भारत हायस्कूल मतदार केंद्रांवर पोहचल्या आणि त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: YamunaBai travel from chandannagr to shivajinagar to vote