
शिवाजीनगर : गावामध्ये नमाजपठण करणारे... २५ वर्षांपासून वारीत सहभागी असलेले मुस्लिम वारकरी यासीन अत्तार यांची ही २६वी वारी. अत्तार लहान असताना त्यांच्या गावात ‘अखंड हरिनाम सप्ताह’ होत असे. तेव्हापासून त्यांना हरिनामाची आवड निर्माण झाली. सुरुवातीला ते खेड ब्रुद्रुक (ता. खंडाळा, जिल्हा सातारा) येथील विठ्ठल सेवा मंडळाच्या १००व्या दिंडीत मानधनावर आचारी म्हणून काम करत असत आणि पंढरपूरला जात असत. आचारी अत्तार आता पखवाजवादक वारकरी बनले आहेत.