मुक्त विद्यापीठातर्फे बी.एड. विशेष विद्यार्थ्यांना ‘यश कार्ड’

मुक्त विद्यापीठातर्फे बी.एड. विशेष विद्यार्थ्यांना ‘यश कार्ड’
Published on

पुणे, ता. १८ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात बी.एड. विशेष शिक्षण (श्रवणबाधित व बौद्धिक अक्षमता) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट आणि उपयुक्त अशा शैक्षणिक ‘यश कार्ड’चे वितरण करण्यात आले.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा शिक्षणशास्त्र विद्याशाखा संचालक डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र पाटोळे, परीक्षा नियंत्रक डॉ. भटूप्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. सोनवणे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करण्यासाठी ‘यश कार्ड’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने ‘यश कार्ड’ आवश्यक आहे.’’ डॉ. पाटोळे यांनी विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. साधना तांदळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवानंद कहाळेकर यांनी आभार मानले.

काय आहे ‘यश कार्ड’?
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे आता डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘यश कार्ड’ हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्याची स्वतंत्र अशी अधिकृत छायाचित्रासह शैक्षणिक आणि डिजिटल ओळख असणार आहे. त्यात त्याचा नोंदणी क्रमांक, अपार व डीईबी आयडी, शैक्षणिक प्रगती, परीक्षा दस्तऐवज, प्रमाणपत्रे आदी सुरक्षितरीत्या उपलब्ध असतील. हे कार्ड क्यूआर कोड प्रमाणित, ब्लॉकचेन प्रणाली आणि डीजी लॉकरशी उच्च संरक्षित पद्धतीने जोडलेले असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com