आसू - आळजापूर गावास याशनी नागराजन यांची भेटत

आसू - आळजापूर गावास याशनी नागराजन यांची भेटत

Published on

आळजापूरमध्ये याशनी नागराजन यांची भेट

आसू, ता. २६ : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पाहणीसाठी आळजापूर (ता. फलटण) गावाला विशेष भेट दिली. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील विविध विकासकामांची आणि शाळेची पाहणी करत ग्रामस्थांशी व विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळा संवाद साधला.
याशनी नागराजन यांनी सर्वप्रथम आळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीम पथकाच्या तालावर त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत केले. त्यांनी गावात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट शाळेच्या नियोजित जागेची, तसेच जिल्हा परिषद शाळेने नव्याने सुरू केलेल्या संगणक लॅबची त्यांनी पाहणी केली.
शाळेतील पाहणीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. विशेष म्हणजे, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२५-२६ मध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी श्रीमती नागराजन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
त्यानंतर त्यांनी गावातील प्रमुख चौक, शुद्ध पाण्यासाठी बसवण्यात आलेला वॉटर फिल्टर प्लँट आणि परिसरातील धार्मिक स्थळांची पाहणी करत ग्रामविकासाचा आढावा घेतला. शेवटी ग्रामपंचायत कार्यालयात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या वेळी त्यांनी शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाबद्दल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी प्रशासकीय स्तरावरील योग्य त्या सूचना संबंधितांना दिल्या.
प्रारंभी नागराजन यांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्या ॲड. किरण नलवडे आणि आळजापूरच्या सरपंच पुष्पा पवार यांनी केले. या पाहणी दौऱ्यावेळी गावातील सर्व प्रमुख मान्यवर, ग्रामस्थ आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

02551
आळजापूर : गावातील विकासकामांची पाहणी करताना याशनी नागराजन, समवेत शुभम नलवडे, किरणताई नलवडे, विलासराव नलवडे आणि इतर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com