विज्ञान प्राविण्य परीक्षेत यशस्विनी निंबाळकर माळशिरस तालुक्यात प्रथम
YSH26B05094
अकलूज (ता. माळशिरस) : विज्ञान प्रावीण्य परीक्षेत तालुक्यात प्रथम मिळविलेल्या यशस्विनी निंबाळकर हिचा मुख्याध्यापक सुनीता वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित मार्गदर्शक शिक्षक.
यशस्विनी निंबाळकर तालुक्यात प्रथम
.........
अकलूज : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता कन्या प्रशालेची विद्यार्थिनी यशस्विनी निंबाळकर विज्ञान प्रावीण्य परीक्षेमध्ये माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल प्रशालेकडून तिचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्न सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाने घेतलेल्या विज्ञान प्रावीण्य परीक्षेमध्ये इयत्ता सहावीच्या १२५ तर इयत्ता नववीच्या वर्गातून ६६ विद्यार्थिनी बसलेल्या होत्या सर्व विद्यार्थिनी उत्कृष्ट श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. या विद्यार्थिनींना अनुराधा कांबळे, स्नेहलता गरुड, योगेश्वरी माने देशमुख, किरण सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले होते. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सुलक्षणादेवी मोहिते-पाटील मुख्याध्यापिका सुनीता वाघ यांनी यशस्विनी निंबाळकरचा सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

