यशवंतराव होळकर यांचा किल्ला सरकारने ताब्यात घ्यावा नाही घेतला तर आम्ही हिसकावून घेऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gopichand padalkar

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्म स्थळापासून जागर अहिल्या युगाचा पराक्रमी इतिहासाचा या तीनदिवसीय यात्रेची सुरुवात केली आहे.

यशवंतराव होळकर यांचा किल्ला सरकारने ताब्यात घ्यावा नाही घेतला तर आम्ही हिसकावून घेऊ

लोणी काळभोर - यशवंतराव होळकरांनी सलग २८ वेळा इंग्रजांशी लढा दिला आहे. आणि तो जिंकलाही आहे. एवढा मोठा इतिहास आमच्या समोर का येऊ नाही दिला. यशवंत होळकरांचा जन्म ज्या वाफगावच्या किल्ल्यात झाला आहे. तो किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. आता तो किल्ला राज्य सरकारने ताब्यात घ्यावा जर तुम्ही हि वास्तू देणार नसाल तर ती आम्हाला हिसकावून घ्यावी लागेल असा इशारा मागणी भाजपा नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्म स्थळापासून जागर अहिल्या युगाचा पराक्रमी इतिहासाचा या तीनदिवसीय यात्रेची सुरुवात केली आहे. यावेळी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खोकलाई देवी चौक या ठिकाणी जागर रथ यात्रेचे आयोजन सोमवारी (ता. ३०) करण्यात आले होते. यावेळी पडळकर बोलत होते.

यापुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले, "मंगळवारी (ता. ३१) चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवीची जयंती आहे त्या ठिकाणी शरद पवारांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ पगड जातीच्या नागरिकांनी त्यांच्या विरोधात बोलले पाहिजे." मागील ५५-६० वर्षात राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री झाले आहेत. पण एकदाही अहिल्यादेवीची जयंती साजरी करण्यासाठी चौंडीला आले नाहीत. आज पवारांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. उद्या नागरिक यांना जाब विचारायला सुरुवात करतील. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित येऊन संघटीत होऊन प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आपली भूमिका ठामपणे मांडली पाहिजे.

जेजुरी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक बांधले. या पुतळ्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. यांना तेथील नागरिकांना दाखवायचे होते कि आमचे धनगर समाजातील नागरिकांवर किती प्रेम आहे. मात्र आम्ही सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका मेंढक्याच्या हस्ते उद्घाटन केले. तरी सुद्धा हा माणूस त्या ठिकाणी जाऊन उद्घाटन करून आला.

दरम्यान, म्हणजे एखादा माणूस रस्त्यावर थुंकला तर ती थुंकी कोणी चाटेल का मात्र या पवारांच्या घराण्याला रस्त्यावर थुंकलेले चाटायची सवय लागली आहे. सांगली मिरज कुपवाड या ठिकाणी महानगरपालिकेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक उभारले होते. त्या ठिकाणीही आम्ही त्यांना संगितले होते येऊ नका तर कुठल्या गाडीत बसू तिथेही एका मेंढक्याच्या हस्ते उद्घाटन केले. हेच सांगण्यासाठी मी लोणी काळभोरला आलो आहे.

Web Title: Yashwantrao Holkars Fort Is Not Taken By Government Snatch It Gopichand Padalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top