विश्‍वासराव सरपोतदार प्रसंग नाट्य स्पर्धेत यशवंतराव मोहिते महाविद्यालय प्रथम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने घेण्यात येणार्‍या विश्‍वासराव सरपोतदार आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या ‘पॅड’ या प्रसंगनाट्याने प्रथम आणि विश्‍वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डीप’ने दुसरा क्रमांक पटकाविला.

पुणे : बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने घेण्यात येणार्‍या विश्‍वासराव सरपोतदार आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या ‘पॅड’ या प्रसंगनाट्याने प्रथम आणि विश्‍वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डीप’ने दुसरा क्रमांक पटकाविला.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पहिला क‘मांक पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दुसरा क‘मांक स. प. महाविद्यालयाला मिळाला. या स्पर्धेत ३४ संघांनी सहभाग घेतला. अभिनेत्री नेहा शितोळे आणि अभिनेता ऋतुराज शिंदे यांनी परीक्षण केले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक, तन्वी सरपोतदार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके पुढील प्रमाणे  :
अभिनय प्रथम - सिद्धेश नेने, (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड) आणि अनन्या चट्टोपाध्याय, (डी. वाय. पाटील स्कूल ऑङ्ग इंजिनिअरिंग, लोहगाव)
अभिनय द्वितीय - भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चार विद्यार्थी आणि रितीका श्रोत्री, पूर्वा देशपांडे (स. प. महाविद्यालय)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashwantrao Mohite College First in the Vishwasrao Sarpotdar Occasion Drama Competition