
यवत : समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे पुणे - सोलापूर रस्त्यावरील यवतमध्ये शुक्रवारी तणाव निर्माण झाला. यातूनच दगडफेकीची घटना घडल्याने जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.