वर्षाराणी सावंत दहिवडीच्या नगराध्यक्षा!

वर्षाराणी सावंत दहिवडीच्या नगराध्यक्षा!

Published on

दहिवडीच्या नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज

वर्षाराणी सावंत यांची आज होणार घोषणा, राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवाराची माघार

दहिवडी, ता. ५ : नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी वर्षाराणी सावंत यांचा एकमेव अर्ज आज शिल्लक राहिला. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली असून, आज अधिकृत घोषणा होईल.
नगराध्यक्षा नीलम जाधव यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत भाजपकडून वर्षाराणी विलास सावंत, महेश पतंगराव जाधव, तर राष्ट्रवादीकडून सुरेंद्र गणपती मोरे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे तिरंगी लढतीची परिस्थिती निर्माण झाली होती.
आज (गुरुवार) दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. भाजपचे डमी उमेदवार असलेल्या महेश जाधव यांनी दुपारी दीड वाजता आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सुरेंद्र मोरे हे आपला उमेदवारी अर्ज ठेवणार की काढणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र दुपारी पावणेचार वाजता सुरेंद्र मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने त्यातील उत्कंठा संपुष्टात आली. नगराध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक उद्या (शुक्रवार) दुपारी १२ वाजता होणार आहे‌. नगराध्यक्षपदासाठी वर्षाराणी सावंत यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडीची अधिकृत घोषणा आज दुपारी होईल.

..........

03738
वर्षाराणी सावंत

.....पूर्ण.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com