

नारायणगाव, ता. १५ : येडगाव (ता. जुन्नर) धरण जलाशयातील कृषी पंपांच्या केबल चोरीचा छडा आठ दिवसांत न लावल्यास नारायणगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
येडगाव धरण क्षेत्रातील इंदिरानगर, खंडोबा माळ व दोन देवळे परिसरात मागील आठ दिवसांत दोनदा केबल चोरीच्या घटना घडल्या. सन २०२०पासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या उपस्थितीत येडगाव येथे ग्रामस्थांची बैठक झाली. वारंवार तक्रार करूनही आरोपी सापडत नसल्याने चोरांचे धाडस वाढल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संपांगे म्हणाल, ‘‘या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे काम सुरू आहे. मात्र, यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. येडगाव परिसरात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या भागातील अनोळखी व संशयित व्यक्तींची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना द्यावी. चोऱ्यांना आळा घालण्यासाठी परिसरात नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे, हॅलोजन दिवे बसवावेत. यासाठी ग्रामपंचायतीने आर्थिक मदत करावी.’’
या बैठकीला फौजदार जगदेव पाटील, पोलिस पाटील गणेश बांगर, बाबाजी नेहरकर, देविदास भोर, शिवाजी नेहरकर, मच्छिंद्र काशीद आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.