पुणे - गेल्या दोन दिवसांपासून शहरात मंगळवारी (ता. ६) वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अद्ययावत निरीक्षणांनंतर आता हा अंदाज बदलला असून, बुधवारी (ता. ७) वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.