Youth Attacked While Walking, Assailants Flee on Bike
Sakal
पुणे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात दोघांनी पादचारी तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीस्वारासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील तीन दिवसांत शहरातील फुरसुंगी आणि येवलेवाडी परिसरात दोन तरुणांचा खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत.