Two Men Arrested for Assaulting Petrol Pump Employee in Yerawada
Sakal
विश्रांतवाडी : येरवड्यातील गुंजन चौकातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करून दहशत माजविणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या. या प्रकरणी कृष्णा प्रभाकर नाईक (वय २५) आणि अक्षय ऊर्फ आबा सुदाम जमदाडे (वय २५, रा. दोघेही गांधीनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.