
पुणे : येरवडा येथून कोरेगाव पार्ककडे येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पुलाच्या मध्यभागी खड्डा पडला असल्याने संबंधित पूल वाहतूकीसाठी तीन दिवस बंद करण्यात आला आहे. संबंधित पूलाच्या दुरूस्तीचे काम महापालिकेकडून करण्यात येत आहे. पुल वाहतूकीसाठी बंद केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.