तर आम्ही उपाशी राहू; चहातील भेसळीवर येवलेंचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

  • अन्नात विष कालवणे आमचे संस्कार नाहीत
  • "येवले अमृततुल्य'चे संचालक नवनाथ येवले यांचे प्रतिपादन

पुणे : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून पैसे कमविण्यापेक्षा आम्ही उपाशी राहू. मात्र कोणाच्याही अन्नात विष कालविण्याचे आमचे संस्कार नाहीत, असे प्रतिपादन "येवले अमृततुल्य'चे संचालक नवनाथ येवले यांनी केले.येवले चहाच्या मसाल्यात "टार्टाझिन' नावाचा कृत्रिम रंग आढळल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ("एफडीए') या अहवालासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडताना ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येवले म्हणाले, "मेलामाईन व रंग वापरण्याची गरज नाही.आमच्या ब्रॅंडला चाळीस हजाराहून अधिक फ्रॅंचायसीची मागणी असतानाही आम्ही फक्त 220 फ्रॅंचायसी दिल्या आहेत. यावरूनही आमचा केवळ पैसे कमविणे हा उद्देश दिसून येत नाही.

महत्वाची बातमी : येवले चहामध्ये भेसळ; लाल रंगाचे गुपित उघड

जास्तीत जास्त उद्योजक घडविणे आणि रोजगारनिर्मिती करणे आमचे ध्येय आहे. 'एफडीएची कोणत्याही प्रकारची न्यायालयीन कारवाई अजूनपर्यंत झाली नसल्याचा खुलासा येवले यांनी केला.पत्रकार परिषदेला संस्थापक तेजस येवले, कायदेशीर सल्लागार सुधीर रेड्डी आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yewale tea explanation about allegations of adulteration dye