Pune News : येवलेवाडीत ड्रेनेज लाईनच्या कामासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; वाहतूक कोंडी

भाजपाचे पश्चिम महाराष्ट्रअध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले
yewalewadi protest drainage line work
yewalewadi protest drainage line work sakal
Updated on

कोंढवा : ड्रेनेज लाईनच्या कामाचा येवलेवाडीतील ग्रामस्थांकडून रास्ता रोको करत निषेध करण्यात आला. यावेळी येवलेवाडी मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरु असलेले काम बंद करण्यात आले.

yewalewadi protest drainage line work
Pune : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात करता येणार 'बीबीए'

मागील काही दिवस खडीमशीन चौक ते येवलेवाडी या रस्त्यावर ६०० मीमी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते, हे काम संथ गतीने सुरु असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

भाजपाचे पश्चिम महाराष्ट्रअध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले. कामठे यांनी हे काम तातडीने बंद करत पावसाळा संपल्यावर सुरु करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली, या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाकडून येवलेवाडी कमानीजवळ पाऊस कमी होईपर्यंत काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

yewalewadi protest drainage line work
Pune : कलमोडी धरणातील पाणी सातगाव पठारला मिळावे व डिंभे धरणातील बोगद्याचे काम रद्द व्हावे - देविदास दरेकर

यावेळी संदीप बधे, गणेश कामठे, माजी सरपंच विठ्ठलराव कामठे, दादासाहेब कामठे, संदीप धांडेकर, प्रविण कामठे, कैलास ठोसर यांच्यासह येवलेवाडी ग्रामस्थ आणि सर्वपक्षिय कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांच्या सूचनेनुसार हे काम बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता पावसामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असून पाऊस कमी झाल्यावरच हे काम पुन्हा सुरु करण्यात येईल. मात्र, येवलेवाडी कमानीजवळील भाग सोडून काम सुरु राहणार आहे. नागरिकांना या कामाचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.

- राजेंद्र जाधव, कार्यकारी अभियंता, ड्रेनेज विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.