पुण्यातील जुन्या घड्याळांची अमेरिकेत ‘टिक-टिक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील जुन्या घड्याळांची अमेरिकेत ‘टिक-टिक’

पुण्यातील जुन्या घड्याळांची अमेरिकेत ‘टिक-टिक’

पुणे: जुन्या घडाळ्यांना (clocks) नवजीवन देणाऱ्या योगेश लेले यांची दखल आता थेट अमेरिकेने (USA) घेतली आहे. पुण्याच्या (Pune) योगेश यांनी जुन्या घड्याळांचे डायल नव्याने तयार केले असून अमेरिकेतील विल्मिंग्टन शहरातील प्रतिष्ठित प्रदर्शनामध्ये त्यांच्या डायलचे स्वतंत्र दालन उभे केले आहे.

जुन्या घड्याळांची पहिल्यापासून आवड असणाऱ्या योगेश यांनी गेल्या काही वर्षांपासून डायल दुरुस्ती आणि ते डायल तयार करणे याचा अभ्यास केला. काही महिन्यांपूर्वी नव्याने केलेल्या डायलची छायाचित्रे त्यांनी सोशल मीडियावर (Social media) शेयर केली. याचीच दखल नॅशनल असोसिएशन ऑफ वॉच अँड क्लॉक कलेक्टर्स (National Asssociation of Watch and Clock Collectors) या संस्थेने घेतली.

"मला लहानपणीपासूनच स्कूटर आणि मोटरस्पोर्ट्सची आवड आहे. यंत्र विषयक कामाची आवड तेव्हापासूनच होती. ती आवड मी अजूनही जोपासतोय. माझ्याकडे सध्या 140 वर्ष जुनी काही घड्याळं आहेत. मी कधी ही या गोष्टीचा व्यवहार केला नसून फक्त छंद म्हणून त्यावर काम करतो",असे योगेश यांनी सांगितले.

"अमेरिकेतील संस्थेने जुन्या घडाळ्यांच्या संग्रहाबाबत मला विचारणा केली आणि तो मागवून घेतला. मी तो पाठवला आणि त्यानंतर त्यांनी प्रदर्शनात माझ्या डायलचे स्वतंत्र दालन करून मांडले”, असे योगेश पुढे म्हणाले.

अभियंता असलेले योगेश लेले सध्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आहेत. इंटरनेटवर (Internet) माहिती घेऊन त्यांनी जुन्या घड्याळांचे डायल हुबेहुब नव्याने तयार करण्याचे तंत्र शिकून घेतले. सुरुवातीला काही जुन्या घड्याळांचे डायल कागदावर तयार केलेले होते. या नंतर हे डायल लाकडावर साकारण्याचे कौशल्यदेखिल योगेश यांनी मिळवले. यानंतर सॉफ्टवेअरचा, UV प्रिटिंग अशा तंत्रांचा वापर करुन अनेक दुर्मिळ घडाळ्यांना नवजीवन मिळवून दिले.

योगेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, NAWCC ही संस्था विविध देशांमध्ये प्रदर्शने भरवते. तिथे मनगटावरच्या घडाळ्यासोबतच खिशातली, भिंतीवरची, टेबलवरची घड्याळे प्रदर्शनात असतात. या प्रदर्शनात घडाळ्यांचा लिलाव देखील होतो. विविध देशांमध्ये या प्रतिष्ठित संस्थेचे १३ हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत. योगेश भविष्यात काही अजून डायल बनवणार असुन त्याचे काम सुद्धा त्यांनी सुरू केले आहे.

Web Title: Yogesh Lele From Pune Redesigned The Dial Of Old Watches Exhibition In Wilmington

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..