
फुरसुंगी हद्दीत सुनीता नावाच्या महिलेच्या घरी सागर गायकवाड (वय 30, लाडेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) याच्याबरोबर चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिले.
तळेगाव स्टेशन(पुणे) : सोमाटणे येथील हडपसरमध्ये विवाहित तरुणासोबत लग्न लावून सांगली जिल्ह्यात नेलेल्या चौदावर्षीय अल्पवयीन मुलीची सांगली पोलिसांनी सुटका केली. तिला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले.
यासंदर्भात अल्पवयीन मुलीच्या आत्याने फिर्याद दिली. त्यानुसार मुलीचे वडील, आजी आणि वर सागर गायकवाड, सुनीता आणि भटजी (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फुरसुंगी हद्दीत सुनीता नावाच्या महिलेच्या घरी सागर गायकवाड (वय 30, लाडेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) याच्याबरोबर चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. या मुलीला पिंपरी-चिंचवड येथील विमेन हेल्पलाइन संस्थेच्या अध्यक्षा नीता परदेशी आणि सांगलीतील कुरळप ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता. 3) ताब्यात घेतले. हा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.