
आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात एक महिला किर्तनकारही आरोपी असून तिच्यासह पाच जणांवर बलात्कार, अपहऱण आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आळंदीतल्या केळगाव रस्त्यावर असणाऱ्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत ही घटना घडलीय. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून सकल मराठा समाजाने या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केलीय.