पुण्यात आणखी एक आत्महत्येची घटना; अकाउंटंट तरुणीने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

माधुरीची आई संध्याकाळी पाच वाजता कामावरून घरी आली. त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळेस...

पुणे : धायरी येथे राहणाऱ्या एका लेखापाल तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पुणे : ग्रामीण भागात वाढलाय सापांचा वावर; सर्पदंश झाल्यास...

माधुरी तानाजी जगदाळे (वय २५, रा. गणेश नगर, उंबऱ्या गणपती जवळ, धायरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी एका खाजगी कंपनीत लेखापाल म्हणून काम करीत होती. शुक्रवारी दुपारी तिचा भाऊ कामाला निघाला होता. त्यावेळी माधुरीने भावाला घराला बाहेरून कुलूप लाऊन जा, आई कामावरून आल्यानंतर कुलूप उघडेल असे सांगितले. त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे भावाने घराला बाहेरून कडी लावली, त्यानंतर तो कामाला गेला.

तुमचा जुना अॅंड्राॅइड फोन शाळेला दान करून गरिब विद्यार्थ्यांना करा मदत

दरम्यान, माधुरीची आई संध्याकाळी पाच वाजता कामावरून घरी आली. त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळेस माधुरीने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतला. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी स्थानिक नागरिकांना बोलावले. नागरिकांच्या मदतीने माधुरीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी रुस्तम शेख करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young lady accountant living in Dhayari has committed suicide by hanging herself at her home