'तुला जिवंत सोडणार नाही' असे म्हणत टोळक्याने तरुणाला संपविले 

A young man in a fatal attack dies during treatment in Pimpri chinchwad
A young man in a fatal attack dies during treatment in Pimpri chinchwad

पिंपरी : मित्राला मारहाण का केली? असा जाब विचारत सात जणांच्या टोळक्‍याने प्राणघातक हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ''तुला जिवंत सोडणार नाही, तुला आज मारूनच टाकतो'', असे म्हणत हल्ला केलेल्या टोळक्याने अखेर त्या तरुणाचा जीव घेतलाच. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

करण महादेव पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आबाशा उर्फ पृथ्वीराज कांबळे, आदित्य भोसले व पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अभिषेक संजय गायकवाड (वय 19, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंकरोड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी (ता.8) सायंकाळी पाचच्या सुमारास पत्राशेड झोपडपट्टीजवळील महापालिकेच्या बंद पडलेल्या इमारतीच्या वाहनतळात फिर्यादी व त्यांचा मित्र राकेश सुरवसे, ह्रुतिक जाधव हे बसलेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे करण पवार हे त्यांच्याकडे येत असताना त्याच्या पाठीमागून आरोपी त्याठिकाणी आले. "तू अमर चव्हाणच्या मित्राला मारतो काय, आज तुला जिवंत सोडणार नाही, तुला आज मारूनच टाकतो' असे म्हणत कोयत्याने वार करीत लोखंडी रॉड, बाटली व दगडाने करण पवार यांस मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान शनिवारी (ता.11) त्यांचा मृत्यू झाला. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन; या गावांचा असेल समावेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com