
पुणे : कोंढव्यातील ज्योती हॉटेलजवळ एका तरुणाचा डोक्यात दगड घालून रविवारी (ता. ११) निर्घृण खून करण्यात आला आहे. यासंदर्भात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण समोर आले नसून सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी तपास सूरू केला आहे.