Missing Case
sakal
- राजेश कणसे
आळेफाटा - शिंदेवाडी (आणे, ता. जुन्नर) येथील संदिप सुदाम शिंदे (वय-३८) हा तरुण ३१ ऑगस्ट रोजी दुपारपासून बेपत्ता झाला आहे. तो नारायणगाव येथे टोमॅटो पट्टीचे पैसे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून मोटारसायकलवरून निघाला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. दरम्यान, त्याची मोटारसायकल बोरी बुद्रुक गावच्या हद्दीत आळे-बोरी रस्त्यावरील कालव्याच्या पुलाजवळ आढळून आली.