Rajgad Fort : राजगड किल्ल्यावर मुळशी तालुक्यातील तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न असफल
rajgad fort
rajgad fortsakal

वेल्हे : किल्ले राजगड (ता. वेल्हे) येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा बालेकिल्ल्याच्या पायथ्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला . पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या तरुणास वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले परंतु ते असफल झाले. आज दुपारी बाराच्या दरम्यान ही घटना घडली असून दीपक दिनकरराव सुकळीकर (वय .३५ )राहणार भुकूम तालुका मुळशी असे तरुणाचे नाव आहे.

याबाबत राजगड किल्ल्याचे पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे माहिती देताना म्हणाले, आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यापैकी एका ग्रुपमधील सदस्य दीपक सुकळीकर हे बालेकिल्ला उतरताना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली घटनास्थळी पुरातत्व विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

कर्मचारी विशाल पिलावरे, आकाश कचरे, दीपक पिलावरे, यांनी उपस्थित काही पर्यटकांच्या मदतीने दीपक यास राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ल्यापासून स्ट्रेचरच्या सहाय्याने खंडोबा माळ येथे मोठ्या जिकरीने खाली आणण्यात आले.

दरम्यान १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क केल्यामुळे रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल बोरसे व चालक तुषार येनपुरे यांनी बेशुद्ध तरुणास प्राथमिक उपचार केले परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्यास तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत भोईटे यांनी दीपक सुकळीकर हे उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले.

किल्ले राजगड व तोरणा गडावर पर्यटकांची वरदळ दिवसेंदिवस वाढत आहे परंतु प्राथमिक उपचाराचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध नसून स्ट्रेचरची सुद्धा दुरावस्था झाली असून पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी तातडीने या सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी दुर्गप्रेमी व शिवशंभु प्रतिष्ठान कात्रजचे अध्यक्ष महेश कदम यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com