
पारगाव - काठापूर बुद्रुक, ता. आंबेगाव गावाच्या हद्दीत पारगाव ते शिरूर रस्तावर कार व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नितीन रघुनाथ दौंड (वय-35 वर्षे, रा. पोंदेवाडी) या गंभीर जखमी झालेल्या या तरुणाची नऊ दिवसापासुन सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून काल रविवारी पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली.