Pune Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक

खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना समोर आली
young man was arrested for molesting minor girl pune marathi crime news
young man was arrested for molesting minor girl pune marathi crime newsSakal
Updated on

Pune Crime : खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एका ३५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणीसाठी जात असताना हा तरुण तिचा दररोज पाठलाग करीत होता.

सोशल मीडियावर तिला मेसेज पाठवत होता. मुलीने त्याला मेसेज पाठवू नकोस, असे सांगितल्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com