esakal | रांगेत येण्यास सांगितल्याने तरूणाला लाथाबुक्‍क्यांनी बेदम मारहाण

बोलून बातमी शोधा

The young man was brutally beaten by a lathi for being queued

रांगेमध्ये न येता मधूनच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येवून थांबले. फिर्यादीने त्यांना रांगेत येण्यास सांगितल्याने आरोपींना राग आला. या रागातून त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्‍की करीत डोक्‍यात लोखंडी वस्तूने मारहाण केली

रांगेत येण्यास सांगितल्याने तरूणाला लाथाबुक्‍क्यांनी बेदम मारहाण
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : आधार कार्ड काढण्यासाठी रांगेत येण्यास सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून तरूणाला बेदम मारहाण केली. ही घटना निगडी येथे घडली.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

उत्कर्ष नागेश मोदी (वय 22, रा. रूपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. 24) सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी हे निगडीतील कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलाशेजारील 'फ' प्रभाग कार्यालयातील आधार सेवा केंद्रावर आधार कार्ड दुरूस्तीसाठी आले होते. तर इतर नागरिकांसमवेत रांगेत उभे असताना आरोपी त्याठिकाणी आले.

मेट्रोचे भुयार पोचले शिवाजीनगर एसटी स्थानकापर्यंत!


रांगेमध्ये न येता मधूनच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येवून थांबले. फिर्यादीने त्यांना रांगेत येण्यास सांगितल्याने आरोपींना राग आला. या रागातून त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्‍की करीत डोक्‍यात लोखंडी वस्तूने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.