बोरीऐंदी येथे दुचाकीवरून कालव्यात कोसळलेला तरूण बेपत्ता

हितेंद्र गद्रे
Sunday, 10 January 2021

 बोरीऐंदी (ता. दौंड) येथे काल रात्रीच्या सुमारास बोरीऐंदी बोरीभडक दरम्यान दुचाकीवरून प्रवास करणाऱे दोन तरूण कालव्यात कोसळले. त्यातील एका तरूणास वाचवण्यास स्थानिक नागरीकांना यश आले. मात्र दुसरा तरूण अद्याप बेपत्ता आहे.

यवत : बोरीऐंदी (ता. दौंड) येथे काल रात्रीच्या सुमारास बोरीऐंदी बोरीभडक दरम्यान दुचाकीवरून प्रवास करणाऱे दोन तरूण कालव्यात कोसळले. त्यातील एका तरूणास वाचवण्यास स्थानिक नागरीकांना यश आले. मात्र दुसरा तरूण अद्याप बेपत्ता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उरूळी कांचन (ता. हवेली) येथे राहणारे दोन तरूण काल रात्रीच्या सुमारास बोरीभडक उरूळी कांचन दरम्यान दुचाकीवरून प्रवास करत होते. काल रात्रीच्या सुमारास बोरीभडक-बोरीऐंदी दरम्यान असलेल्या मुळा मुठा कालव्याच्या पुलावरून ते दुचाकीसह कालव्यात कोसळले. यांपैकी एकास वाचवण्यास स्थानिक नागरीकांना यश आले. मात्र दुसरा तरूण दुचाकीसह बेपत्ता झाला आहे.

स्थानिक नागरीकांच्या मदतीने यवत पोलिस त्याचा शोध घेत आहेत. नवा मुठा कालव्यावरील बहुतांश पुलांना कठडे राहिलेले नाहीत. पन्नास वर्षांहून अधिक जूने असलेले हे पुल खुपच जिर्ण झालेले आहेत. त्यांच्या देखभाल दुरूस्तीची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र त्याकड़े पाटबंधारे विभाग सोईस्करपणे डोळेझात करत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये संतप्त भावना आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या बाबत बोरीभडकचे जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पवार म्हणाले, ''या पुलावर आजवर अनेकदा आपघात झाले आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र पुल पुर्ण कोसळल्या खेरीज त्याकडे लक्ष द्यायचे नाही अशी पाटबंधारे विभागाची अजवरची परंपरा आहे. त्यामुळे हा पुल दुरूस्त किंवा नव्याने बांधावा यासाठी तो मुद्दामहून पाडण्याचा निर्णय गावकऱ्यांना घ्यावा लागेल.''

(संपादन : सागर डी. शेलार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man who fell into a canal on a two-wheeler has gone missing at Boriandi