aarush joshi
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - अवकाशाविषयीचे कुतूहल आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर पुण्यातील पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने थेट अवकाशात आपली छाप उमटवली आहे. आंबेगाव-कात्रज येथील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलचा दहा वर्षांचा विद्यार्थी आरुष जोशी याने दोन नव्या लघुग्रहांचा शोध लावला. मंगळ आणि गुरू ग्रहांदरम्यान असलेल्या मुख्य लघुग्रह पट्ट्यात हे दोन लघुग्रह आहेत. या कामगिरीमुळे त्याला या लघुग्रहांना स्वतःचे नाव देण्याचा बहुमानही मिळणार आहे.