पुणे : पर्स, चप्पल चोरीचा आळ घेतल्याने तरुणीची आत्महत्या

घरमालक महिलेवर गुन्हा दाखल
crime
crimesakal

उंड्री : पर्स व चप्पल चोरीचा आळ घेतल्याने तो सहन न झाल्याने एका १७ वर्षाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मोहमंदवाडी येथे शुक्रवारी उघडकीस आली.पायल बाबू चव्हाण (वय १७, रा. कृष्णानगर, मोहमंदवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या आईने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उंड्री येथील एका ४० वर्षाच्या महिलेवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पायल ही उंड्री येथील आरोपी महिलेच्या घरी गेल्या काही महिन्यांपासून घरकाम करीत होती. या महिलेने तिच्यावर पर्स व चप्पल चोरीचा आळ घेतला होता. त्यावरुन घरमालकिण हिने पायल हिला सातत्याने त्रास दिला होता. चोरीचा हा आरोप सहन न झाल्याने तिने शुक्रवारी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दगडे अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com