रस्ता अडवल्याने धाकट्या भावाने थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

बारामती तालुक्यातील मोडवे येथील घटना
Younger brother killed elder brother with ax for blocking the road at Modwe in Baramati Taluk
Younger brother killed elder brother with ax for blocking the road at Modwe in Baramati Taluk sakal

वडगाव निंबाळकर - शेतात जाणारा रस्ता अडवल्याच्या कारणावरून धाकट्या भावाने थोरल्या भावाला कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील मोडवे गावचे हद्दीत मोटेवस्ती येथे शुक्रवार ता. १२ दुपारी आडीचच्या सुमारास घडली.

तायाप्पा सोमा मोटे वय ६० असे कुऱ्हाडीच्या घावाने मृत्यू झालेल्या थोरल्याचे नाव असून रामा सोमा मोटे असे मारणारा धाकट्याचे नाव आहे. याबाबत मयत तायाप्पाची सुन लक्ष्मी महादेव मोटे रा. मोढवे, मोटेवस्ती, ता. बारामती जि. पुणे. यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मयत तायाप्पा सोमा मोटे हे आरोपी धाकटा भाऊ रामाला तु शेतात जाणारे वाटेवर लाकडाचे ओंडके आढवे का टाकले आहे असे विचारले असता त्या कारणावरुन दोघांमध्ये भांडणे झाली आजूबाजूला सोडवायला कोणी आली नाही परिणामी एकमेकांवर कुऱ्हाडीने घाव घातले गेली यामध्ये तायाप्पाच्या डोक्यात घाव बसल्याने मृत्यू झाला तर रामाच्या पायावर घाव बसल्याने गंभीर जखमी झाला आहे बारामती येथील खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी भेट देऊन घडलेले परिस्थिती बाबत पंचनामा नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com