
रांजणी : येथील ग्रामदैवत श्रीनरसिंह मंदिरात दर शनिवारी सायंकाळी होणाऱ्या श्रीनरसिंह महाराजांच्या ग्रामस्थांनी सुरु केलेल्या सामुहिक महाआरतीला महिला,जेष्ठांसह तरुण वर्गाचा दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे.दर शनिवारी होणाऱ्या आरतीला ८०० ते ९०० जणांचा सहभाग असतो यामध्ये विशेष म्हणजे तरुणांचा सहभाग मोठा असून तरुण वर्गाचा कल अध्यात्माकडे वाढू लागला आहे.याची दखल महाराष्ट्र राज्य मंदिर परिषदेने घेऊन या स्तुत्य उपक्रमाचे जाहीर कौतुक केले आहे.